नोटबंदीमध्ये गँगस्टर विकार दुबेनं केला ‘ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट’चा खेळ ! STF च्या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गँगस्टर विकास दुबेचा खेळ जरी संपला असला तरी, त्याचे कारनामे आता उघड होत आहेत. या दरम्यान एन्काउंटरनंतर जेव्हा विकास दुबेच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) यूपी पोलिसांकडे विकास दुबे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा आणि गुन्हेगारी कारवायातील साथीदारांचा तपशील विचारला आहे. विकास दुबेविरोधात फौजदारी खटल्यांच्या सद्यस्थितीबद्दलही अंमलबजावणी संचालनालयाने माहिती मागितली आहे.

यावेळी, मिळालेल्या माहितीनुसार विकास दुबेने नोटाबंदीपूर्वी अंदाजे 6.30 कोटींची रोकड 2% व्याजदरावर चालविली होती, असे सांगितले जात आहे की, जय बाजपेयींने या 2% ला 5% सवलतीच्या दरात बाजारात दिला आहे. जय बाजपेयी हा तोच माणूस आहे, जो विकास दुबेच्या फायनास आणि सर्वात विश्वासू होता. इतकेच नाही तर विकास दुबेने आपल्या काळ्या कमाईचा काही भाग दुबई आणि थायलंडमध्ये गुंतविला आहे. विकास दुबेच्या नातेवाईकांच्या नावावर सापडलेल्या मालमत्ता कागदपत्रानुसार नोटाबंदीच्या वेळी विकास दुबेने बर्‍याच लोकांच्या पैशांची गुंतवणूक केली होती. सुमारे पन्नास कोटी रुपये विकासने नोटबंदीच्या दरम्यान मालमत्ता खरेदीसाठी खर्च केले होते. त्यापैकी बरेच पैसे कानपूरच्या व्यावसायिकाचे होते. याशिवाय काही अधिकाऱ्यांचीही नावे समोर येत आहेत.

या सर्वा व्यतिरिक्त विकास दुबेच्या नावावर लखनऊमध्ये दोन मोठी घरे आहेत. सध्या विकास दुबेची पत्नी रिचा दुबेची पोलिसांनी बर्‍याच घटनांमध्ये आणि विशेषत: राजकारणी आणि उद्योजकांशी असलेल्या संबंधांबद्दल चौकशी केली आहे. एन्काउंटरआधी कानपूरमधील स्थानिक प्रशासनाने विकास दुबेचे किल्ल्यासारखे घर जेसीबीच्या मदतीने पाडले होते, ज्याचा उपयोग पोलिस पथकाला घेराव घालण्यासाठी केला जात होता. त्यानंतर त्याच्या मोटारी जेसीबीखाली चिरडल्या गेल्या. लखनऊमधील घराकडेही प्रशासनाचे लक्ष आहे. मालमत्ता संदर्भात चौकशी सुरू आहे.

दरम्यान, कानपूर घोटाळ्याचा आरोपी गँगस्टर विकास दुबे 10 जुलै रोजी सकाळी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांच्याशी झालेल्या चकमकीत मारला गेला. यूपी एसटीएफ गाडी विकास दुबेला घेऊन मध्य प्रदेशातील उज्जैनहून कानपूरकडे येत होती. पावसामुळे कानपूरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अचानक गाडी पलटी झाली आणि विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, यात तो मारला गेला. आता पोलीस विकास दुबेचे मदतनीस, त्याच्या टोळीतील इतर सदस्यांचा तपास करत आहेत आणि दुसरीकडे मालमत्तेचाही शोध सुरू झाला आहे.