काय सांगता ! होय, ‘या’ IPS नं 24 तासांपुर्वीच सांगितलं होतं विकास दुबेचा एन्काऊंटर कसा होणार, ट्विट व्हायरल

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचा वॉन्टेड गुन्हेगार विकास दुबे याच्या अटकेपर्यंत आणि त्यानंतर आता एन्काऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सर्वात जास्त प्रश्नचिन्हे ही उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर उभी आहेत. केवळ विरोधीच नव्हे, तर पोलिस विभागाचे काही उच्च अधिकारीही या एन्काऊंटरवर प्रश्न विचारताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणादरम्यान आयपीएस अमिताभ ठाकूर यांचे एक दिवस जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

विकास दुबे याने आत्मसमर्पण केल्याचे अमिताभ ठाकूर यांनी ट्विटवर लिहिले आहे. कदाचित उद्या तो यूपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करेल आणि मारला जाईल. अमिताभ ठाकूर यांचे ट्विट 245 वेळा रिट्विट केले गेले आहे. त्यावर 739 लाईक्स मिळाल्या आहेत. यावर 51 लोकांच्या टिप्पण्याही आल्या आहेत.

https://twitter.com/Amitabhthakur/status/1281128705335521281

अमिताभ यांच्या ट्विटला पुन्हा रिट्विट करणारे लोक सतत यूपी पोलिसांवर प्रश्न विचारत आहे. यापूर्वी अमिताभ यांनी ट्वीट केले होते की, आम्हाला विकास दुबेला अटक करता आले नाही. त्याने उज्जैन येथे आत्मसमर्पण केले. इतक्या मोठ्या घटनेनंतरही आम्ही त्याला अटक करू शकलो नाही. तो बऱ्याच ठिकाणाहून दुर्गम ठिकाणी फिरला. मला वाटते की, या बिंदूची सखोल चौकशी देखील केली पाहिजे.

https://twitter.com/Amitabhthakur/status/1281092418020900864

सकाळी विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याची बातमी मिळाली. यानंतर, अमिताभ ठाकूर यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये पोलिसांना प्रश्न केला आहे. आपल्या आजच्या ट्विटमध्ये अमिताभ यांनी असे लिहिले आहे की, एवढी काय घाई होती? कोणाला वाचवले जात आहे?

https://twitter.com/Amitabhthakur/status/1281432148881207296