विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर Twitter वर ट्रेंड करतोय रोहित शेट्टी ! जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाईन टीम : 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करणारा मुख्य आरोपी विकास दुबे शुक्रवारी (दि 10 जुलै) सकाळी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला. पोलिसांनीही याची पुष्टी केली आहे. यानंतर आता विरोधी पक्ष युपी सरकार आणि पोलिसांच्या वर्तुणुकीवर सवाल उपस्थित करत आहेत. असं सगळं असताना आता डायेरक्टर रोहित शेट्टी अचानक ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे.

ट्विटरवर ट्रेंड होतोय रोहित शेट्टी
बॉलिवूडमध्ये सिंघम आणि सिंघम 2 असे सिनेमे करणाऱ्या रोहित शेट्टीच्या अ‍ॅक्शन सिनेमांसोबत लोक आता या एन्काऊंटरची तुलना करत आहेत.

पोलीस आणि गुंड्यांमध्ये एन्काऊंटर
रोहित शेट्टीच्या अनेक सिनेमात पोलीस आणि गुंड्यांमध्ये अ‍ॅक्शन आणि एन्काऊंटर पहायला मिळत असतं. अनेक लोक आता असं म्हणत आहेत की, विकास दुबेचा एन्काऊंटर झाल्यानंतर रोहित शेट्टी म्हणत असेल की, ही तर माझीच स्क्रीप्ट आहे. अनेक युजर्सनं वेगवेगळे फोटोही शेअर केले आहेत.

रोहित शेट्टीला या स्क्रिप्टसाठी बोलवण्यात आलं होतं
एका युजरनं फोटो शेअर करत लिहलं की, ज्या पद्धतीनं ही कार पलटी झाली आहे. मी विचार करत आहे की, रोहित शेट्टीला या स्क्रिप्टसाठी बोलवण्यात आलं होतं.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like