Vikas Dube Encounter : UP चा ‘तो’ गँगस्टर ज्याला मारण्यासाठी पहिल्यांदाच वापरली गेली AK47

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या चकमकीत गँगस्टर विकास दुबे ठार झाला. तो पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्याच्यावर गोळीबार करावा लागला. विकास दुबेबरोबरच यूपीमध्ये त्या गुंडाचीही जोरदार चर्चा व्हायला लागली, ज्याने राज्यात गुन्हेगारीला जोरदार प्रोत्साहन दिले. श्री प्रकाश शुक्ला, हे असे नाव होते जे 90 च्या दशकात उत्तर प्रदेशातील पोलिसांकरिता सर्वात मोठे आव्हान बनले. श्री प्रकाश शुक्ला अवघ्या 25 वर्षांचा होता, जेव्हा त्याने उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना मारण्याची सुपारी देखील घेतली होती. त्या गुंडाच्या एन्काउंटरनंतरही अशीच चर्चा रंगली होती. बर्‍याच ठळक बातम्याही छापल्या. विकास दुबेबरोबरच यूपीमधील लोक पुन्हा शुक्लचा उल्लेख करत आहेत.

वयाच्या 20 व्या वर्षी गुन्हेगारी जगात प्रवेश
श्रीप्रकाश शुक्लाचा जन्म गोरखपूरच्या मामखोर गावात एका शिक्षकाच्या घरी झाला. जेव्हा त्याने गुन्ह्याच्या जगात प्रवेश केला तेव्हा तो केवळ 20 वर्षांचा होता. 1993 मध्ये राकेश तिवारी नावाच्या व्यक्तीने त्याच्या बहिणीचा विनयभंग केला आणि त्याने त्याची हत्या करून आपल्या बहिणीच्या विनयभंगाचा बदला घेतला. येथूनच त्याच्या गुन्ह्यांची मालिका सुरू झाली. गँगस्टर शुक्लाच्या आयुष्यातील हा पहिला गुन्हा होता आणि याचबरोबर त्याने पैलवानकी सोबत गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला होता. बहिणीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीची हत्या करून शुक्ला थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये पळून गेला होता. पण तो भारतात परतला आणि त्यानंतर बिहारला पोहोचला.

मुख्यमंत्र्यांना मारण्यासाठी 5 कोटीची सुपारी
श्रीप्रकाश शुक्ला यांनी बिहारमधील सूरजभान गँगशी हातमिळवणी केली आणि तो आणखी मजबूत झाला. 1997 मध्ये शुक्लाने वीरेंद्र साही या नेत्याची हत्या केली. या हत्येमध्ये शुक्लाने एके 47 चा वापर केला होता. यानंतर त्याची हिम्मत आणखी वाढली.1998 मध्ये त्याने बिहार सरकारचे मंत्री ब्रिज बिहारी प्रसाद यांना त्यांच्याच सुरक्षारक्षकासमोर ठार केले. यानंतर शुक्लाने यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या हत्येची सुपारी घेतली. ही सुपारी पाच कोटीची होती आणि ही त्याची शेवटची सुपारी ठरली. हे षड्यंत्र अयशस्वी केल्यानंतरच त्याचा एन्काउंटर करण्यात आला आणि पोलिसांना यश आले.

पहिल्यांदाच मोबाईल सर्विसचा वापर
1998 मध्ये, यूपी पोलिस एडीजी अजयराज शर्मा यांनी गुंड श्रीप्रकाश शुक्लाला पकडण्यासाठी 50 जवानांचा समावेश करून एक विशेष टास्क फोर्स (एसटीएफ) ची स्थापना केली. असे म्हटले जाते की, हा पहिला एन्काउंटर होता, ज्यात पोलिसांनी मोबाइल सर्व्हिलान्स आणि एके-47 चा वापर केला होता. एसटीएफने शुक्लाचा फोन सर्व्हिलन्सवर ठेवला होता, पण कशी तरी ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली. यानंतर शुक्लाने त्याच्या फोनऐवजी पीसीओ वापरण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शुक्लाच्या मैत्रिणीचा फोनही सर्व्हिलान्स ठेवला होता. तेव्हा पोलिसांना समजले की, शुक्ला गाझियाबादमध्ये पीसीओ वापरत होता.

गाझियाबादमध्ये 25 वर्षीय शुक्लाची हत्या
पोलिसांना माहिती मिळाली कि, शुक्ला गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये पीसीओ वापरत आहेत. 4 मे 1998 रोजी शुक्लाला पकडण्यासाठी पोलिस तेथे पोहोचले पण तो आधी पळून गेला. वसुंधरा एन्क्लेव्हच्या थोड्या अंतरावर एसटीएफने त्याला घेरले. शुक्लाना शरण जाण्यास सांगितले होते. त्याऐवजी त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला आणि प्रत्युत्तरात शुक्ला मारला गेला. त्यावेळी तो 25 वर्षांचा होता. ‘सहार’ हा चित्रपट 2005 मध्ये शुक्लाच्या आयुष्यावर प्रदर्शित झाला होता. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘रंगबाज’ ही सिरीजही रिलीज झाली आहे.