8 पोलिसांचा ‘मारेकरी’ विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ‘गारद’ !

कानपुर : आठ पोलिसांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि मास्टरमाइंड विकास दुबे याचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दावा केला आहे की, या एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेचा मृत्यू झाला आहे. सध्या, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विकास दुबेला स्ट्रेचरवर लाला लाजपत राय हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले आहे.

एसटीएफ विकास दुबेला कानपुरला आणत होती, आज सकाळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही दुर्घटना कानपुर टोल प्लाझापासून 25 किलोमीटर अंतरावर झाली. जेव्हा गाडी अपघातग्रस्त झाली, त्यावेळी विकास दुबे पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळाला.

घटनास्थळापासून सात से आठ किलोमीटरच्या अंतरावर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमकम झाली. या चकमकीत विकास दुबे गंभीररित्या जखमी झाला. विकास दुबे ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र, यास अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कशी झाली दुर्घटना

दुर्घटनेबाबत युपी एसटीएफचे अधिकारी सध्या काही बोलत नसले, तरी मुसळधार पाऊस आणि गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी पलटी झाली आहे. मीडियापासून विकास दुबेला लांब ठेवण्यासाठी गाडीचा वेग खुप जास्त होता. सध्या क्राइम स्पॉटवर पोलिसांनी कुणालाही जाण्यास प्रतिबंध केला आहे.