‘तो खूप लकी होता, म्हणूनच तो आतपर्यंत जिवंत राहिला’, विकास दुबेच्या पत्नीनं सांगितलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कानपूर गोळीबारात ठार झालेल्या आठ पोलिसांचा आरोपी आणि गँगस्टर विकास दुबे उत्तर प्रदेश पोलिस एन्काउंटरमध्ये मारला गेला. यानंतर विकास दुबेची पत्नी रिचा दुबेने सांगितले की, बस स्टँडवर टीव्ही पाहून कानपूर चकमकीची त्यांना माहिती मिळाली. विकास दुबेच्या पत्नीने सांगितले कि, विकास त्यांच्या मोठ्या भावाचा मित्र होता. 23 वर्षापूर्वी विकास दुबेशी त्यांचे लग्न झाले होते. रिचाने सांगितले की, ती विकास दुबे यांना भांडण्यापासून रोखत असे.

रिचा म्हणाली, ‘मी फक्त माझ्या मुलांना वाढवत होते. गुन्ह्याशी काही संबंध नाही. मला मुलांना गुन्हेगारीच्या वातावरणापासून दूर ठेवण्याचे होते. ती फक्त मुलांची भेट घडवून देण्यासाठी गावी जात असे. माझ्या आयुष्याचे ध्येय फक्त माझी मुले आहेत. त्याच्या कृतींचा माझ्या आणि माझ्या मुलांवर परिणाम होऊ नये. कानपूर चकमकीत शहीद झालेल्या पोलिसांविषयी रिचा दुबे म्हणाली, ‘पोलिसांच्या पत्नीबद्दल माझ्या संवेदना. विकासने चुकीचे काम केले. मला विकासाच्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची आहे. अशा घटनेनंतर विकास दुबे माझ्यासमोर असता तर स्वत: गोळी मारण्याची क्षमता ठेवली असती, कारण 17 घरे उध्वस्त होण्यापेक्षा एक घर उध्वस्त होणे चांगले.

किती मालमत्ता?

कोटींच्या मालमत्तेबाबत रिचा दुबे म्हणाल्या, या सर्व खोट्या बातम्या आहे. विकासकडे मालमत्ता असती तर आज मी एका छोट्या घरात राहिले नसते, परदेशात राहिली असती. रिचा म्हणाली की, मी माझे दुःख व्यक्त करण्यास सक्षम नाही. मी घराबाहेर पडू शकत नाही. विकास दुबेचे नशिब होते की, म्ह्णून तो आतापर्यंत जिवंत राहिला.

राजकीय कॉरिडोरमध्ये विकास दुबेची वर पर्यंत पोहोच असल्याचे समजते. त्याचवेळी विकास दुबेचे पोलिस अधिकाऱ्यांशीही संपर्क होता, त्यामुळे तो बरीच वर्षे बचावला. मात्र, या आरोपांवर विकासच्या पत्नीने सांगितले की, आपल्याकडे विकासच्या संपर्कातील माहिती नाही. विकास कोणाशी भेटायचा हे तिला माहित नाही. तसेच, तिने विनय तिवारी यांना ओळखत नसल्याचेही सांगितले.