विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देण्याचा प्रयत्न, योगी सरकारविरूध्द काँग्रेस-बसपाकडून ‘ब्राम्हण कार्ड’ ?

लखनौ – पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशमध्ये कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग दिला जात आहे. तसेच सरकार पडण्याचा इशारा सोशल मीडियातून दिला जात आहे. आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिसांनी १० जुलै रोजी चकमकीत एन्काऊंटर केला. मात्र, या एन्काऊंटरवरविरोधी पक्ष तसेच विविध संघटनांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्डचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहींनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिलीय. तर काहीजण फेसबूकवरून योगी सरकार पाडण्याची धमकी देताहेत. काँग्रेसस पक्षाला देखील विकास दुबेच्या एन्काऊंटरवरून ब्राह्मण कार्डामध्ये राजकीय संधी दिसू लागलीय.

उत्तर प्रदेशातील अनेक ब्राह्मणांनी आपल्या फेसबूक पेजवरून विकास दुबेच्या एन्कांटरवरून उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोहिम उघडलीय. यात एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘तुम कार पलटो हम सरकार पलटाएंगे’. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले की, श्रीप्रकाश शुक्ला याच्या एन्काऊंटरनंतर कल्याण सिंह पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. म्हटलं, आठवण करून देऊ’. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले आहे की, परशुरामाचा वंशज आहे, पुन्हा कधीच ठाकूर समाजाच्या व्यक्तीला मत देणार नाही.

विकास दुबेची पत्नी व मुलाचा फोटो देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. तसेच काँग्रेसचे काही नेते २२ वर्षांच्या अमर दुबेचे एन्काऊंटर आणि त्याच्या पत्नीला केलेल्या अटकेला मुद्दा पुन्हा बाहेत काढत आहेत. काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णन यांनी प्रभात मिश्राचा एन्काऊंटर आणि अमर दुबेच्या पत्नीला केलेल्या अटकेवरून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

बसपाप्रमुख मायावती यांनीही यात उडी घेत म्हंटले आहे कि, ब्राह्मण समाज भीतीच्या छायेखाली आहे. कुठल्याही एका चुकीच्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देऊ नये. सरकारने कुठलेही अशाप्रकारचे काम करू नये, ज्यामुळे ब्राम्हण समाज भयभीत होईल. मायावती यांच्या या टीकेला काँग्रेस नेते नेते जितीन प्रसाद यांनीही समर्थन दिले असून ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांचे आभारही मानले आहेत.