विधानसभा उपाध्यक्ष विजय औटींना मोठा धक्का ! कट्टर विखे समर्थक आणि सभापती राहुल झावरेंचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीत पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. झावरे यांच्या भूमिकेमुळे विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का बसला आहे. या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे हे शिवसेना सदस्यांच्या पाठिंब्यामुळे सभापतीपदी विराजमान झाले होते. झावरे हे कट्टर विखे समर्थक मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून झावरे हे औटी यांच्यावर नाराज होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा साधा नामोल्लेखही केला नाही. त्यामुळे राहुल झावरे हे नाराज होते.

औटी यांच्याकडून सन्मान दिला जात नसल्याने नाराज असलेल्या राहुल झावरे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीत विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठा धक्का बसला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी