Vikhroli landslide | विक्रोळीत पुन्हा एकदा दरड कोसळली, कारचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबई शहरला पावसाने (Mumbai Rain) अक्षरश: झोडपले आहे. शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. मुंबईतील चेंबूर (Chembur) आणि विक्रोळी (Vikhroli) भागात दरड कोसळल्याची (Vikhroli landslide) घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्घटना घडली आहे. ती देखील विक्रोळीत. कालच विक्रोळीत घरावर दरड कोसळून (Vikhroli landslide) 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना आज पुन्हा याच भागात दरड कोसळली आहे.

विक्रोळीतील पार्क साईट (Park site) भागात आज दरड कोसळली. कैलास कॉम्प्लेक्स जवळील पॉपटेट्स या हॉटेलजवळ दरड कोसळली. ही दरड उभ्या असलेल्या दोन कारवर कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरड कोसळल्याचे फोटो समोर आले आहेत.

दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू

दरम्यान विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील पंचशील नगर भागात दरड ( residential building collapsed) कोसळल्याने ही दुर्घटना घडली. विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही दुर्घटना घटली. शनिवारी मध्यरात्री पावणे तिनच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली.

हे देखील वाचा

Pune Crime | मुंबई उच्च न्यायालयानं सचिन पोटे, अजय शिंदे, विठ्ठल शेलार यांच्यावरील मोक्क्याच्या तपासाबाबत दिला ‘हा’ महत्वपुर्ण आदेश

Raisin Water | जाणून घ्या मनुकाच्या पाण्याचे काही फायदे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Vikhroli landslide | vikhroli west again landslide near pop tates kailash complex park site no casualties

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update