Vikram Gokhale | ‘त्या’वरून विक्रम गोखले संतापले; म्हणाले – ‘त्याबद्दल आपल्याला शरम वाटत नाही का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vikram Gokhale | बाॅलीवुड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावरुन देशभरातून कंगणावर टीका होऊ लागली. कंगणाच्या विधानाचं समर्थन जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी (Vikram Gokhale) केल्यावर त्यांच्यावरही जोरदार टीका होऊ लागली आहे. यावरुन आज (शुक्रवारी) विक्रम गोखलेंनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

 

विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, ‘2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आणि ते मी मुळीच बदलणार नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मी त्या मूळ भाषणात असं म्हणालो की, ‘दे दी हमे आझादी बिना ढाल’. म्हणजे विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग जे बाकीचे ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, फाशीवर चढले, ब्रिटिशांना गोळ्या घातल्या, त्यांची अवहेलना झाली याची आपल्याला कोणालाच शरम वाटत नाही? त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही? याचा मला राग आला, असं मत गोखलेंनी मांडलं आहे.

दरम्यान, माझी कंगनाशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं आहेत. ती आता सांगत बसत नाही. 18 मे 2014 रोजीचा गार्डियनचा अंक वाचा. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो. त्यावरून ताबडतोब बोंबाबोंब सुरू झाली, असं गोखले यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Vikram Gokhale | actor vikram gokhale clears his stand about statement support kangana ranaut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nanded Crime | जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण ! नायब तहसीलदारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jacqueline Fernandez | जॅकलीनने केला केसांसाठी ‘जुगाड’ अन् अक्षय कुमारने केला व्हिडीओ शेअर, पाहून सर्वच ‘हैराण’ (व्हिडिओ)

High Court | दोन धर्माच्या प्रौढ जोडप्याच्या वैवाहिक जीवनात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही – हायकोर्ट

Supreme Court | CBSE, ICSE बोर्डाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; SC नं विद्यार्थ्यांची रिट याचिका फेटाळली

Sameer Wankhede | मलिकांच्या ‘त्या’ आरोपावरुन वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले – ‘वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच, ‘मी 2006 पासूनच…’

Mumbai Crime | राजकीय नेत्यांनी पैसे बुडवल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या; परिसरात प्रचंड खळबळ

IND vs NZ | मुंबईकरांसाठी खुशखबर ! दुसऱ्या टेस्टबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय; या गोष्टीला दिली परवानगी?