Vikram Gokhale | ‘शाहरुख आणि आर्यन खान माझे काहीही वाकडं करू शकणार नाहीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  Vikram Gokhale। काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी कंगना रणौतच्या वक्तव्याला पाठिंबा देऊन या वादात उडी घेतली आहे. कंगनानं जे विधान केले ते बरोबर आहे. मी त्याचं समर्थन करतो असं विक्रम गोखले म्हणाले होते. त्यांच्या या समर्थनामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याचबरोबर त्यांनी शाहरुख खान ( Shah Rukh Khan) आणि आर्यन खानवरही (Aryan Khan) निशाणा साधला आहे.

 

मुंबई क्रुझवरील छापेमारीसंदर्भात (Mumbai Cruise Drugs Case) बोलताना विक्रम गोखले (Vikram Gokhale)
म्हणाले जर एखादा 21 वर्षीय सैनिक देशासाठी बॉर्डरवर गोळी लागून शहीद होतो तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही.
शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका विक्रम गोखले यांनी मांडली आहे.
त्यासोबत ते कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करताना कोणाच्या मदतीनं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. ते भिकेतच मिळालंय.
आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा कुणी त्यांना फाशीपासून वाचवलं नाही हे चुकीचं आहे असं ते म्हणाले.

 

बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारण वेगळ्या स्तरावर पोहचले

 

बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) हे माझे मामे सासरे होते.
माझी सख्खी आत्येसासू ही शिवसेनेच्या महिला आघाडीची पहिली प्रमुख होती.
मी 40 वर्ष बाळासाहेबांचे भाषण ऐकतोय. त्यांच्या निधनानंतर राजकारण विचित्र स्तरावर पोहचले.
मराठी माणूस हा भरडला जातोय. लोकं अस्वस्थ आहेत त्याची तुम्हाला कल्पना नाही.
आमच्यासारखी माणसं फिरत असतात. प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की, गणित चुकलेले आहे.
सुधारायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
शिवसेना-भाजपानं एकत्र आलेच पाहिजे असे मत अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मांडले आहे.

 

नरेंद्र मोदी (Narendra Modi) माझे नायक

 

विक्रम गोखले नरेंद्र मोदींबद्दल बोलताना म्हणाले पक्षाचं काम सगळे करतात पण देशासाठी नरेंद्र मोदी जेव्हा उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात.
तसेच नरेंद्र मोदी पक्षाच्या बाजूने काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही.
महागाई काय मोदींनी वाढवली आहे का? एक व्यक्ती गेल्या 70 वर्षापासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे.
त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही का? असा सवालसुद्धा विक्रम गोखले यांनी विचारला आहे.

 

Web Title : Vikram Gokhale | Actor vikram gokhale target shah rukh khan and aryan khan over mumbai cruise drugs case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dr. Shirish Gode | भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम देतीय 15 लाख रुपये कमावण्याची संधी ! जाणून घ्या किती गुंतवणुकीवर मिळू शकतो लाभ

Good Governance | प्रशासनात सुधारणा करण्यासाठी पीएम मोदी यांनी 77 मंत्र्यांना 8 गटांत विभागले, दिले ‘हे’ निर्देश