
Vikram Gokhale | ‘बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील’ – विक्रम गोखले
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची (Shivsena) स्थापना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी (Marathi) माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरु आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले. पुण्यात ब्राह्मण महासंघाद्वारे (Brahman Mahasangh Pune) त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कर्याक्रमात ते बोलत होते. विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकीय मुद्यावर अनेक रोखठोक विधानं केली.
विक्रम गोखले पुढे म्हणाले, चुकलेलं गणित नीट करायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे.
त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजप आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
असे विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले.
म्हणून मी पुढाकार घेतोय
राज्यातील महाविकास आघाडीवर (MVA) त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेना-भाजप एकत्र (Shivsena-BJP alliance) यावेत म्हणून माझे प्रयत्न सरु आहेत.
तुमचं तरी काय बिघडलं असतं. ती चूक झाली.
ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घ्यायला हवा, मी घेतोय पुढाकार, असे देखील गोखले म्हणाले.
बाळासाहेब माझे मामेसासरे
राज्या जे सुरुय ते योग्य नाही. माझी सख्खी आत्तेसासू ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची पहिली प्रमुख होती.
बाळासाहेब हे माझे मामेसासरे होते. बळासाहेबांचीच भाषणं ऐकून गेली 40 वर्षे महाराष्ट्र तृप्त झालेला आहे.
त्यांच्या निधनानंतर राजकारणामध्ये (Politics) जे खेळ सुरु आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत.
ते पाहून खरंतर मराठी माणूस भरडला जातोय. प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की सरकारचं हे गणित चुकलेलं आहे, असे विक्रम गोखले म्हणाले.
Web Title : Vikram Gokhale | Balasaheb’s soul must be suffering a lot shiv sena and bjp should come together says vikram gokhale
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना सुनावले, म्हणाले-‘अरे शाहण्या तु…’