Vikram Gokhale Death | शरद पोंक्षे भडकले, म्हणाले – ‘श्रध्दांजली वाहून मोकळे झालेल्यांचा जीव आज शांत झाला’

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Vikram Gokhale Death | ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अनेकांचे गुरु गेले आहेत, अशी प्रतिक्रिया अभिनय क्षेत्रातील मान्यवरांनी दिली. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाट्य जगतातील चालते फिरते विद्यापीठ आज हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्यावरुन आता अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम गोखलेंच्या निधनापूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांना शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी सुनावले आहे.

शरद पोंक्षे यांनी विक्रम गोखलेंच्या अनेक निर्मितीमध्ये काम केले होते. त्यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. विक्रम गोखले आमच्या अनेक पिढ्यांचे गुरू होते. त्यांच्याकडे बघून आम्ही अभिनय शिकलो आणि घडलो आहोत. त्यांनी अनेक कलावंत तयार केले आहेत. गेले चार दिवस त्यांच्या निधनाच्या बातमीचा समाज माध्यमांवर सर्वांनी खेळखंडोबा केला होता. धड बातमी नसताना सगळेजण श्रद्धांजली वाहून मोकळे झाले होते. ज्या कुणी श्रद्धांजली वाहिली, घाणेरड्या शब्दांत ज्यांनी हे मांडले त्या सगळ्यांचा जीव आज शांत झाला असेल, असे यावेळी शरद पोंक्षे म्हणाले. (Vikram Gokhale Death)

दोन दिवसांपूर्वी विक्रम गोखले गेल्याची खोटी माहिती प्रसारीत झाली होती.
त्यावेळी अनेकांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली होती. त्यामुळे शरद पोंक्षे संतापले होते.
विक्रम गोखलेंना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title :- Vikram Gokhale Death | actor sharad ponkshe on vikram gokhale death news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर बोपदेव घाटात गोळीबार, शहरातील गोळीबाराची तिसरी घटना

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या मुलीने एव्हरेस्टचा बेस कॅम्प 7 दिवसात केला सर