Vikram Gokhale Death | विक्रम गोखले यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि उध्दव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Vikram Gokhale Death | मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपट जगताचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विक्रम गोखले यांना ट्वीटरच्या माध्यमातून गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Vikram Gokhale Death)

“आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Vikram Gokhale Death)

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लिहितात, “मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने चित्रपटजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे.” तसेच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते, बोलते विद्यापीठ हरपले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंत नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे विक्रम गोखले होते. भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले असेल. प्रत्येक भूमिकेला त्यांनी सुयोग्य न्याय दिला होता.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विक्रम गोखलेंच्या निधनाच्या वार्तेवर विश्वास बसत नाही.
त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे. त्यांची एक कसदार राजबिंडा अभिनेता म्हणून ओळख होती.
अनेक विषयांवर त्यांची मते ठाम होती. त्यामुळे त्यांचे जाणे मनाला मान्य होत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहत प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे.
रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला,
असे शरद पवार म्हणाले आहेत.

Web Title :- Vikram Gokhale Death | cm eknath shinde devendra fadnavis and other political leaders reaction on vikram gokhale death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Mumbai Crime | राजघराण्याचा वारस असल्याचे सांगून 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक; गोरेगावातील टिक टॉक ‘हिरो’ला अटक