Vikram Gokhale Death | विक्रम गोखले मुंबईत असताना अमिताभ बच्चन यांनी ‘अशी’ केली होती त्यांची मदत

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन- आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमीसह मराठी व हिंदी चित्रपटांवर स्वतःची छाप उमटविणारे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे नुकतेच निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांची छाप सोडली. विशेषतः रंगभूमीवर त्यांनी मोठा काळ गाजवला. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी समाज माध्यमांवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांना मधुमेहाचा त्रास होता, तसेच त्यांना जलोदर झाल्याने ते उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांची प्रकृती स्थिर होती, पण नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. प्रकृती सुधारत असे वाटत असताना ती अजून बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठी सिनेसृष्टी नंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, करिअरच्या सुरुवातीला त्यांना फार कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.
त्यावेळी पुरेसे पैसे नसल्याने मुंबईत राहण्यासाठी त्यांना घर नव्हते. त्या कठीण परिस्थितीत बिग बी म्हणजे
अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती. विक्रम गोखलेंनी ईटाम्सला 2020 साली दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता.

या घटनेबाबत माहिती देत विक्रम गोखले म्हणाले, “मनोरंजनसृष्टीत काम करताना सुरुवातीच्या काळात मला फार
कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. मी मुंबईत 1995-99 काळात घर शोधत होतो, पण त्यावेळी घर घेण्यासाठी
माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी मला सरकारी घर मिळवून देण्यासाठी मदत केली.
त्यावेळीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्यमंत्री यांना अमिताभ बच्चन यांनी स्वतः पत्र लिहीले.
त्यांच्यामुळे मला मुंबईत सरकारी घर मिळाले. अजूनही माझ्याकडे ते पत्र आहे”.

पुढे ते म्हणाले, “ मी आणि अमिताभ बच्चन गेल्या 55 वर्षांपासून मित्र आहोत. मला त्यांचा स्वभाव आवडतो.
मी अजूनही आठवड्यातून एकदा त्यांचे चित्रपट बघतो. मला याचा गर्व आहे की, मी त्यांना आणि ते मला ओळखतात.”

Web Title :- Vikram Gokhale Death | veteran actor vikram gokhale passed away amitabh bachchan help him to get house in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Mumbai Crime | राजघराण्याचा वारस असल्याचे सांगून 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक; गोरेगावातील टिक टॉक ‘हिरो’ला अटक