Vikram Gokhale Death | पुण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने सांगितली विक्रम गोखलेंबद्दलची आठवण; तीन महिन्यापूर्वी पोलिस स्टेशन मध्ये झाली होती भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vikram Gokhale Death | आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमीसह मराठी व हिंदी चित्रपटांवर स्वतःची छाप उमटविणारे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे आज (शनिवार) निधन झाले. त्यांनी केलेल्या कामाची आठवण, त्यांच्या बरोबर अभिनय करताना आलेले अनुभव, त्यांच्याकडून शिकता आलेल्या गोष्टीची चर्चा त्यांच्याशी आणि सिनेसृष्टीशी निगडित व्यक्ती करत आहेत. अशीच एक आठवण हिंजवडीच्या पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सांगितली. (Vikram Gokhale Death)

‘विक्रम गोखले १९ ऑगस्ट २०२२ ला पिस्तुल परवाना नूतनीकरनासाठी हिंजवडी पोलीस ठाण्यात आले होते.
तेव्हा त्यांचा हात गळ्यात अडकवून ते पोलिस स्थानकात आले होते, शूटिंग दरम्यान अपघात होऊन त्यांचा हात
जायबंदी झाल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं, आमचं आयुष्य असंच आहे असंही ते म्हणाले, त्यांच्याशी एक तास हसत खेळत गप्पाही झाल्या.’ या गप्पा दरम्यान विक्रम गोखले म्हणाले होते, “मला पोलिसांविषयी विशेष आदर आहे, अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ चित्रपटातील कमिश्नर गायतोंडे ही भूमिका माझी आवडती भूमिका.” शेवटी विक्रम गोखले जात असताना त्यांचा पुष्पगुच्छ देऊन हिंजवडी पोलिसांनी सत्कार केला होता, असेही वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगळीकर यांनी सांगितले. (Vikram Gokhale Death)

मुगळीकर हे स्वतः कवी असून, त्यांची कवितांची एक सीडी प्रकाशित झाली आहे. FTI येथे आंदोलनावेळी बंदोबस्ताला असताना मुगळीकर हे पुस्तक वाचत होते, असा एक फोटो दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाला होता.
साहित्याची जाण आणि आवड असल्याने मुगळीकर यांचे पोलीस दलासह सहित्यकारांशी विशेष स्नेह आहे.
यातूनच विक्रम गोखले हे पोलीस ठाण्यात आले तेव्हा अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या…

Web Title :-  Vikram Gokhale Death | vikram gokhale came to the police station three months ago senior police inspector vivek mugalikar share that memory

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro | शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या माहितीसाठी संकेतस्थळ विकसित

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत

Akola Crime | ‘मला सासु-सासऱ्यांनी मारहाण केलीय, मी आता…’, पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करुन तरुणानं उचललं टोकाचं पाऊल