Vikram Gokhale Death | विक्रम गोखलेंनी दोन वेळा घेतला होता अभिनयातून संन्यास; पहिल्यावेळी संन्यास घेण्याचे ‘हे’ सांगितले होते कारण

पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमीसह मराठी व हिंदी चित्रपटांवर स्वतःची छाप उमटविणारे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Death) यांचे आज (शनिवार) निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सिनेसृष्टीतुन हळहळ व्यक्त केली जात असून भारताच्या सर्व कोपऱ्यांमधून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. विक्रम गोखले (Vikram Gokhale Death) यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांची प्रकृती स्थिर होती, पण नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. प्रकृती सुधारत आहे, असे वाटत असताना ती अजून बिघडली आणि त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या कामाची आठवण, त्यांच्या बरोबर अभिनय करताना आलेले अनुभव, त्यांच्याकडून शिकता आलेल्या गोष्टीची चर्चा अनेक अभिनेते आणि सिनेसृष्टीशी निगडित व्यक्ती करत आहेत. तसेच त्यांचा जीवन प्रवास उलगडून पहिला जात आहे. त्यांनी २०१६ नंतर रंगभूमीला निरोप दिला होता, हे तर तुम्ही वाचलं असेल, पण त्यांनी त्या आधीही एकदा सात वर्ष रंगभूमीतून संन्यास घेतला होता. त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली होती. त्यांनी आर्थिक कारणांमुळे अभिनयाला राम राम ठोकला होता, त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना वेळेवर मिळत नसल्याने कंटाळून त्यांनी हे क्षेत्र सोडले होते. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती, पण केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने त्यांना घर चालविणे अवघड झाले होते.

दूरदर्शनला दिलेल्या त्या मुलाखतीचा एका भाग सगळीकडे पसरत असून, त्यात विक्रम गोखले
(Vikram Gokhale Death) यांनी सांगितले की, त्यांनी १९८२ ते १९८९ च्या काळात अभिनयाला राम राम ठोकला होता.
त्यांनी असे करू नये, असा आग्रह अनेकांनी त्यांना केला पण कोणत्याही आग्रहाला न जुमानता त्यांनी त्या
काळात संन्यास घेतला होता. या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले होते, ‘एखाद्या माणसाची त्याच्यावर
अवलंबून असलेल्या कुटुंबाची उपजीविका विशिष्ट क्षेत्रामुळे चालत असेल तर, त्या क्षेत्राने ही त्याच्या
कामाशी प्रामाणिक राहून वेळोवेळी मोबदला देणे गरजेचे असते. माझ्या कामाचे, कष्टाचे पैसे जर माझ्या
वेळेत मिळणार नसतील तर या क्षेत्राचा मला उपयोग काय? माझ्या कष्टाच्या पैशांसाठी जर मला हात पसरावे लागत असतील तर, ते मला त्रासदायक वाटतं आणि त्यामुळे मी अभिनय सृष्टीला हात जोडून निघून गेलो होतो. त्यामुळे कला क्षेत्रातल्या गोष्टींना अर्थकारणाची योग्य जोड मिळणे आवश्यक आहे.’ असे ते या व्हिडिओत बोलताना दिसतात.

Web Title :-Vikram Gokhale Death | vikram gokhale retired from acting not once but twice read in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर बोपदेव घाटात गोळीबार, शहरातील गोळीबाराची तिसरी घटना

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या मुलीने एव्हरेस्टचा बेस कॅम्प 7 दिवसात केला सर