Vikram Gokhale | ‘त्या’ मुलीची अन् माझी ओळख नाही, पण…’ – विक्रम गोखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vikram Gokhale | अभिनेते विक्रम गोखले यांनी नुकतंच पुण्यामध्ये (Pune) एका कार्यक्रमादरम्यान राजकीय भूमिकांवर भाष्य केलं. यानंतर त्यांनी कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) वक्तव्याचं समर्थन केलं होतं. यानंतर समाज माध्यमांवर गोखले यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. या टीकेवरुनच विक्रम गोखलेंनी (Vikram Gokhale) आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले विक्रम गोखले?

यावेळी बोलताना विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, ‘कंगना राणावत या मुलीने गेल्या दोन वर्षात जी काही भाष्य केली आहेत, ती तिची वैयक्तिक मतं आहेत. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात. मात्र, मी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला यात माझीही काही कारणं असू शकतात, ती समजून न घेताच याबाबत धुरळा उडवायला सुरुवात झाल्याचं गोखले यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, त्या मुलीची आणि माझी ओळख नाही. आम्ही कधी एकत्र कामही केलेलं नाही. परंतु, तरीही कुणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा अधिकार आहे. असं गोखले म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘माझी तिच्याशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं आहेत, आता ती सांगत बसत नाही. पण, 18 मे 2014 रोजीचा गार्डियनचा अंक आहे. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय, त्याची कॉपीही माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो.. ताबडतोब बोंबाबोंब… सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक म्हणून हा माझा अभ्यास आहे. सन 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं, हे माझं प्रामाणिक मत असून ते मी मुळीच बदलणार नाही. ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणात, जे तुम्ही दाखवलंच नाही, अश्रू ढाळणारे स्वातंत्र्यसैनिक ज्यांचे शिव्या शाप मला मिळताहेत, त्यांना कळेल विक्रम गोखले काय बोलले आणि काय दाखवलं. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान केलेला नाही, असं ते म्हणाले.

Web Title : Chandrakant Patil | will urge pm narendra modi to bring back agricultural laws bjp chandrakant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ