×
Homeताज्या बातम्याVikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77...

Vikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची तब्येत प्रचंड खालावली. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून होते. आज (शनिवार) दुपारी 2.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे (Vikram Gokhale Passes Away ) मराठी रंगभूमीची मोठी हानी झाली आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात 30 ऑक्टोबरला आपला 77 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर काहीच दिवसात त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत (Vikram Gokhale Passed Away) मालवली.

विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्व व्यासपीठ गाजवले. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. सध्या ते ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांची काही वर्षापूर्वी स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम गोखले यांनी साकारलेली मोरेशवर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके

कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला,
नकळत सारे घडले, बॅरिस्टर, महासागर, संकेत मीलनाचा, सरगम

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट

मॅरेथॉन जिंदगी (20170), आघात (2010 दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट), आधारस्तंभ,
कळत नकळत (1991), ज्योतिबाचा नवस, दे दणादण, नटसम्राट (2015), महानंदा (1985), माहेरची साडी (1991), वजीर

विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट

अकेला (1991), अग्निपथ (1990), आंदोलन (1995), क्रोध (1990), खुदा गवाह (1992),तडीपार (1995),
तुम बिन (2001), थोडासा रूमानी हो जाए (1990), प्रेमबंधन (1979), लाडला (1994), वजीर (1994),
हम दिल दे चुके सनम (1999)

Web Title :-   Vikram Gokhale Passes Away | Veteran Actor Vikram Gokhale passes away in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | महिलेचा अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करुन केला व्हायरल, उत्तर प्रदेशातील तरुणावर FIR

Pune Police | पुण्यात नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील

Must Read
Related News