Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार

पोलीसनामा ऑनलाइन : Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे 26 नोव्हेंबर रोजी निधन झाले. अनेक दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि ते आपल्याला सोडून गेले. त्यांच्या मृत्यूने सिनेसृष्टीत एक मोठी शोककळा पसरली, तर मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. तरीही आता विक्रम गोखले यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Vikram Gokhale)

आपल्या अभिनयाने विक्रम गोखले यांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते. आगामी चित्रपट ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटात संगीताचा ताल दडलेला आहे हे जाणवते, तर या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. (Vikram Gokhale)

या चित्रपटाची निर्मिती अभिषेक किंग कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी केले आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी या चित्रपटाच्या वितरणाचे काम पाहिले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर राजश्री मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. ते शेअर करत लिहिले आहे की, “मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपणारा आणि अबोल नात्यांना बोलतं करणारा ‘सूर लागू दे’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर सिनेमाचे मुख्य कलाकार दिवंगत विक्रमजी गोखले यांना समर्पित”.

विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता आणि त्यांच्या पोटात पाणी झाल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ
मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
अनेक दशकापासून सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या विक्रम गोखले यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Web Title :- Vikram Gokhale | poster of vikram gokhales sur lagoo de released

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; पिकअप वाहन उलटले, 7 जण जखमी

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर