Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेने-भाजप (Shivsena-BJP alliance) पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना रोखठोक प्रश्न मी विचारला होता असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी सांगितले. पुण्यात ब्राह्मण महासंघाद्वारे (Brahman Mahasangh Pune) त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कर्याक्रमात ते बोलत होते. विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकीय मुद्यावर अनेक रोखठोक विधानं केली. ज्या मुख्यमंत्रिपदावरुन (CM) शिवसेना-भाजप युती तुटली यावर भाष्य करताना त्यांनी गौप्यस्फोट केला.

 

शिवसेना-भाजप एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. युती झाली त्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना थेट विचारणा केली होती.
शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी दिलं असतं तर काय बिघडलं असत? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता.
त्यातही आधीच अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची ? असंही मी त्यांना म्हटलं होतं.
असं विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले. यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काय होती? असं त्यांना विचारण्यात आलं.
त्यावर ते म्हणाले ‘फडणवीसांनी झाली चूक’ असं म्हटलं होतं, असा दावा विक्रम गोखले यांनी केला.

 

फक्त फडणवीसांची चूक नाही

 

फडणवीसांनी तेव्हा झाली चूक असं म्हटलं होतं. परंतु खरंतर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही.
त्यांच्यात जे काही झालं होतं त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना तुम्ही फसवू शकत नाही.
करण मग लोक कधीतरी त्याची प्रचंड शिक्षा तुम्हाला करतात. ती आता आपण भोगत आहोत.
मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही.
मी फडाफडा बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश वगैरे झुगारुन देतो, असंही ते म्हणाले.

 

भाजप-शिवसेनेनं एकत्र यावं

 

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्या कारणासाठी केली.
ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरु आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे.
असंही गोखले म्हणाले. चुकलेलं गणित नीट करायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे.
त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजप आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही विक्रम गोखले म्हणाले.

 

Web Title : Vikram Gokhale | shivsena bjp alliance break bjp leader devendra fadnavis said was my mistake says vikram gokhale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vikram Gokhale | ‘बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील’ – विक्रम गोखले

PM Kisan | सर्व शेतकर्‍यांना दरमहिना मिळतील 3000 रुपये, जाणून घ्या काय आहे ही नवीन योजना आणि कसा करावा अर्ज?

Pune Corona | पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांचे पुन्हा शतक, गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी