Vikram Gokhale Health Update | विक्रम गोखलेंची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयाने दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vikram Gokhale Health Update | गेल्या काही दिवसांपासुन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची तब्येत पुन्हा खालावल्याची माहिती रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे. या आधीही त्यांची तब्येत खालावली होती, तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना ४८ तासांनी व्हेंटिलेटर वरून हलवले जाईल अशी माहिती रुग्णालयाने २५ नोव्हेंबरला दिली होती. मात्र, आता त्यांना व्हेंटिलेटर वरून काढण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे. (Vikram Gokhale Health Update)

या आधी त्यांच्या मृत्यूची बातमी काही माध्यमांनी (पोलीसनामा नव्हे) प्रसारित केली होती. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांनी त्या बातमीचे खंडन केले होते. नंतर, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती खुद्द रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, म्हणून अनेकांनी प्रार्थाना केली आहे.

Web Title :-Vikram Gokhale | vikram gokhale health update actors health deteriorated Dinanath Mangeshkar Hospital pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | ठाकरे गटाची चिंता वाढणार? उदय सामंतांचा मोठा दावा, म्हणाले – ‘गुवाहाटीवरून परत येताना आमच्यासोबत’

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील

Sanjay Raut | ‘या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का?’; रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल