Vikram Gokhale | राजकारण्यांनी ST ची वाट लावली, ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंचा संताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ऐकेकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) अर्थात एसटीच्या ब्रँड अँबेसिडर (Brand Ambassador) असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी सध्याच्या परिस्थीवर भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर (ST Workers Strike) भाष्य करताना विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, जगातलं बसचं एक नंबरचं नेटवर्क असलेल्या एसटीची राजकारण्यांनी वाट लावली, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

 

विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, मी एकेकाळी एसटी महामंडळाचा ब्रँड अँबेसिडर होतो. त्यावेळी एसीटवर मी बराच अभ्यास केला.
एसटीच्या एकूण अर्थशास्त्रावरती माझा लेख ही प्रसिद्ध झाला होता.
त्यावर एवढा अभ्यास एसटी महामंडळातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनीही केलेला नाही, अशा प्रतिक्रिया विद्वान लोकांनी दिल्या होत्या.
एसटीला, एअर इंडियाला (Air India) गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केलं आहे.
एअर इंडिया जगातील एकमेव एअरलाईन होती जी 60 हजार कोटी रुपयांच्या फायद्यात होती.
ती आता 40 हजार कोटींच्या तोट्यात आहे. याचे कारण फक्त राजकीय लोक (Political people) असल्याचे ते म्हणाले.

 

गोखले पुढे म्हणाले, एसटी दारोदारी जाणारी आहे, ती काय कुठली ट्रॅव्हल कंपनी नाही.
एसटी रस्त्यात बंद पडली तर दुसरी एसटी मागून ताबडतोब मागवून घेतात.
एसटी महामंडळासारखी 18 हजार बसेसची ताकद आहे का कोणाकडे? जगातील एक नंबरची बस यंत्रणा आहे. या यंत्रणाची राजकारण्यांनी वाट लावली.

 

Web Title : Vikram Gokhale | vikram gokhale who remains brand ambassador expressed his feelings on st workers strike in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Izzat MST | रेल्वेने कमी केली माननीयांची ’इज्जत’, नियमांमध्ये केले ‘हे’ बदल, गरिब प्रवाशांच्या अडचणी वाढणार

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 966 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते’