Vikram Gokhale | आगामी काळात विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही; ‘या’ मराठी निर्मात्याने केले जाहीर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Vikram Gokhale | बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने काही दिवसांपूर्वी भारताला 1947 साली मिळालं ते स्वातंत्र्य भीक होती, खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असे वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते. याचदरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी या वादामध्ये उडी घेत कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. कंगनाच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो. कंगना जे बोलली ते खरं आहे. तिच्या मताशी मी सहमत आहे, असं मत विक्रम गोखले (Vikram Gokhale ) यांनी व्यक्त केले होते.

याच पार्श्वभूमीवर आता एका मराठी निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखलेंसोबत काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
शाळा, फँड्री अशा गाजलेल्या चित्रपटांचे मराठमोळे निर्माते निलेश नवलाखा ( Nilesh Navlakha) यांनी ट्विट करून याची घोषणा केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘मी विक्रम गोखलेंबरोबर काम केलं आहे.
कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना राणौत जे बोलली त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणा आहे.
जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाही हे पण घोषित करतो,’ असे लिहिले आहे.

 

विक्रम गोखले काय म्हणाले होते ?

 

देशाला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होतं, असं कंगना म्हणाली होती.
विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांनी कंगनाच्या या वक्तव्याचे समर्थन करताना कंगना जे म्हणाली आहे ते खरं आहे.
ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे.
हे दिलं गेलेलं आहे बरं का? ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले.
त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही असे विक्रम गोखले म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

 

Web Title : Vikram Gokhale | will never going work actor vikram gokhale future marathi producer nilesh navalakha tweet goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Central Bank Of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

PAN Card वरील फोटो आणि स्वाक्षरी बदलायची आहे का? ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन करू शकता हे काम, जाणून घ्या

ICC T-20 Ranking | आयसीसीकडून टी- 20 रॅकिंग जाहीर ! पाकिस्तानचा दबदबा तर भारतीय खेळाडूंना फटका