चंद्रयान – 2 : विक्रम ‘लँडर’चं कठीण लँडिंग झालं, NASA नं केले फोटो ‘रिलीज’

न्यूयार्क : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने 26 सप्टेंबर रोजी चंद्रयान -2 विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होते त्या जागेची हाय रिझोल्यूशनची इमेज जारी केली आहे. विक्रम’ लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे नासाने या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहे. चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडर चांद्रभूमीवर जेथे उतरणार होते, तेथील जागेचे फोटो नासाच्या यानाने काढले असून, त्यांचे विश्लेषण नासा करीत आहे. याबाबत नासाने एक निवेदन जारी केले आहे.

https://twitter.com/NASA/status/1177326999657943060

नासाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘विक्रम लँडर 6 सप्टेंबर रोजी पूर्व नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 4:24 वाजता (पूर्वेकडील प्रकाश वेळेनुसार) लँडिंग करणार होते. चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न होता. ही जागा तुलनेने दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किलोमीटर (370 मैल) अंतरावर होती. नासाच्या ल्युनर रेकनिन्स ऑर्बिटर (एलआरओ) या यानाने 17 सप्टेंबरला विक्रम लँडरच्या ज्या ठिकाणी उतरणार होते त्या ठिकाणाची म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची छायाचित्रे काढली आहेत. विक्रम चंद्रावर उतरताना जोराने आदळले हे स्पष्ट झाले असून विक्रम नेमक्या कोणत्या जागी आदळले हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. ही छायाचित्रे 150 किमी इतक्या अंतरावरून काढण्यात आली आहे.

Lunar surface

नासाचे एलआरओ त्या जागेवरून जेव्हा गेले, तेव्हा तेथे चांद्र संध्याकाळ होती. त्यामुळे बराच भाग अंधारात होता. त्यामुळे एलआरओसी टीम विक्रम लँडर शोधू शकला नाही किंवा प्रतिमा तयार करू शकला नाही. विक्रम लँडर एका सावलीत लपला असावा.’

ऑक्टोबरमध्ये जेव्हा एलआरओ पुन्हा या ठिकाणाहून जाईल आणि पुन्हा एकदा लँडर शोधून काढण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्या भागात प्रकाश असेल आणि ही योजना उपयुक्त ठरेल, अशी माहिती नासाने दिली आहे.

चंद्रावर अजून काही दिवस रात्र असणार आहे. तसेच तेथील तापमान वजा 183 डिग्री सेल्सियस इतके आहे. अशा परिस्थितीत विक्रम सुरक्षित राहिला या याबाबत देखील शंका आहेत. इतक्या कमी तापमानात विक्रममधील अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा खराब होऊ शकतात.

Visit : policenama.com