15000 हजाराची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – रहिवासी दाखला आणि जात प्रमाणपत्र व डोमेसाईल प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना गाव नागडे येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज येवला बसस्टँड समोरील साईनाथ चहाच्या टपरीमध्ये सापळा रचून करण्यात आली. जनार्दन कचरू वाघ असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांना त्यांच्या मुलाला सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये प्रेवश घेण्यासाठी नागडे गावचा रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी त्यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. तक्रारदार यांना आवश्यक असणारी कागदपत्रे येवला येथील प्रांत कार्य़ालयातून काढून देण्यासाठी वाघ याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 15 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (दि.3) तक्रार केली. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी वाघ याने येवला येथील एसटी स्टँडसमोर लाच स्विकारण्याचे कबुल केले. पथकाने आज येवला एसटी स्टँड परिसरात सापळा रचून वाघ याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक कल्पना वारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस नाईक हनुमंत बोरकर, किशन चिंतोरे, सचिन गायकवाड, अमरजितसिंह चौधरी, अंकुश गाडेकर, सुरेश पांचाळ, मारोती सोनटक्के, अनिल कदम यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like