संशयावरून चोर म्हणून जमावानं त्याला ‘बडवलं’ बेदम, तरूणाचा झाला जागीच मृत्यू

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चोर असल्याच्या संशयावरून गावातील हिंसक जमावाने एका तरूणाला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने तरूण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील बल्लारपूर बायपास मार्गावरील पागलबाबा नगर येथे घडली आहे. या मॉबलिंचिंगच्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

या मृत तरूणाचे नाव पंकज लांडगे आहे. काही दिवसांपासून बल्लारपूर परिसरात चोरांचा सुळसुळाट झाल्याच्या विविध प्रकारच्या अफवा पसरल्याने नागरिक भयभयीत झाले होते. रात्रीच्या वेळी सर्वजण सतर्क रहात आहेत. त्यातच हा तरूण गावात आल्याने त्यास चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की, या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही गावाला भेट देऊन पाहणी केली. पंकजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा तपास रामनगर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/