‘वाजत-गाजत’ शेतकर्‍यानं केलं म्हशीच्या पिल्लाची ‘मूंज’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिथे एका शेतकऱ्याने वाजत- गाजत दुर्गा माता मंदिरात आपल्या म्हशीच्या रेडक्याच्या मुंडन कार्यक्रमाचे आयोजन केले. हा मुंडन विधी पाहण्यासाठी गावातील लोकही मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आनंदाने या कार्यक्रमाचा एक भाग बनले. या अनोख्या मुंडन कार्यक्रमात विधिवत केस कापण्यात आले. याशिवाय दुसऱ्या विधीही पार पडल्या.

ही घटना फतेहपूर जिल्ह्यातील खागा तहसीलच्या सारौली गावची आहे. गावातील शेतकरी जयचंद्र सिंहने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शेतकऱ्याने म्हंटले कि, त्याच्या म्हशीने जितक्या वेळा रेडक्यांना जन्म दिला ते जगू शकले नाही. त्यामुळे आनंदाने यावेळी मुंडनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेतकऱ्याने पुढे म्हंटले कि, रेडक्यांचा मृत्यूनंतर नुकसान तर होतच होते सोबतच म्हैस दूधही देत नव्हती. यामुळे त्यांनी गावातील दुर्गा माता मंदिरात नवस मागितला की, त्यांच्या म्हशीने यावेळी रेडक्याला जन्म दिला तर ते त्या पिल्लाचा मुंडन विधी त्यांना गावातील दुर्गा मातेच्या मंदिरात मुंडन विधी मिळतील.

काही दिवसांनी जयचंद्र यांची इच्छा पूर्ण झाले. त्यामुळे त्यांनी वाजत गाजत मुंडन संस्कार आयोजित केले. त्याचवेळी हा अनोख्या मुंडन विधी पाहण्यासाठी गावाच्या परिसरातील लोक मोठ्या संख्येने मंदिराच्या आवारात उपस्थित होते. शेतकरी जायचंद्र याची भावना आहे कि, दुर्गा मातेच्या मंदिरात रेकड्याचे मुंडन केल्याचे त्याच्या म्हशीचे रेडकू जिवंत राहील. तसेच त्याने सांगितले कि, दुर्गा माता मंदिरात नवस केल्यापासून त्याची म्हैस देखील ठीक आहे. ती रेडक्याला जन्म देण्यांबरोबर दूधही देत आहे.