मित्राला ‘सॉरी’ म्हणून घराकडे जाणाऱ्या पोरीला नागरिकांनी चोर समजून चोपलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमध्ये एका मुलीला गंभीर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मित्राला भेटून घरी येणाऱ्या या मुलीला जमावाने मोठ्या प्रमाणात गंभीर मारहाण केली. मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात हि घटना घडली असून मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून गावातील काही लोकांना ताब्यात घेतले आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या मित्राची माफी मागून परत येत असताना तो मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला आणण्यासाठी गेला असताना ती कुत्र्याच्या भीतीने टॉयलेटमध्ये लपली. मात्र यामध्ये त्या मित्राच्या एका नातेवाईकाने दिला पाहून चोर असल्याचे समजून गावकऱ्यांना गोळा केले. त्यानंतर सर्वानी तिच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. तिने सांगितले कि, ज्यावेळी तिला मारहाण करत होते त्यावेळी ते चोर चोर असे ओरडत होते. मात्र त्याच दरम्यान, काही लोकांनी तिला वाचवले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून तिच्या जबाबावरून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असून तिच्या भावाने तिच्या मित्रावरच आरोप करत त्याने हा कट रचल्याचा आरोप केला.

दरम्यान, पोलीस उपाधिक्षकांनी या घटनेवर बोलताना सांगितले कि, गुन्ह्याची नोंद केली असून काही जणांना अटक देखील करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like