नकाणे रस्ता निकृष्ट कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी; ग्रामस्थांची मागणी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – उपनगर नकाणे ग्रामस्थांनी मोराणे, गोंदुर बायपास चौफुली ते देवपूरातील जामचा मळा पर्यत नकाणे, वार रस्त्यांच्या रुंदीकरण व डांबरीकरण, मजबुतीकरण, क्रॉंक्रीटीकरण काम सार्वजनिक बांघकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. परंतू हे काम बरेच दिवसांपासून रेंगाळलेले आहे. ज्या अर्धटप्प्यात हे काम सुरु आहे ते हि निकृष्ट दर्जाचे होते. यामुळे वाहतुकीवर ताण येत आहे. रस्ता खराब असल्यामुळे अपघात होत आहे.

रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण व्हावे कामाचा दर्जा तपासावा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करता नकाणे ग्रामस्थ हे एकत्र आले. लेखी निवेदन तयार करुन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी वान्मती सी व जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना लेखी निवेदन दिले. योग्य कारवाई न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार आहे. याला प्रशासन जवाबदार राहिल असा गर्भित इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी महेंद्र पाटील, किशोर पाटील, हेमकांत पाटील, संतोष पाटील, बिपीन पाटील, योगेश खैरनार, विजय वाघ, गौरव पाटील, राहुल भामरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –