किरनळ्ळी गावचा सुपूञ महेश शिंगाडे यांची इंडियन आर्मीत निवड झाल्या बदल ग्रामस्तातर्फे सत्कार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   अक्कलकोट तालुक्यातील किरनळ्ळी महेश शिंगाडे या तरूणांची भारतीय सैन्य दलात निवड होऊन काही महिने ट्रेनिंग बंगलोर येथे झाल्यानंतर आता 3 महिन्यांचे ट्रेनिंग बेळगांव येथे होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर किरनळ्ळी गावात समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शिंगाडेच्या निवडी नंतर गावकर्‍यांनी जल्लोष साजरा केला.

गावकर्‍यांकडून सत्कार झाल्यानंतर शिंगाडे भावूक झाले. त्यांनी देखील संपुर्ण गावकर्‍यांचे आभार मानले.