निंबी ग्रामस्थांनी घेतली आमदार सिरस्कार यांची सदिच्छा भेट

बाळापूर :पोलीसनामा आॅनलाइन – निंबी गावातील ग्रामस्थांनी  रस्त्याच्या विकासकामांसह अन्य कामांच्या संदर्भात बाळापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांची सदीच्छा भेट घेतली.

यावेळी निंबी ग्रामस्थांनी गावाचा रस्ता, मंदिर, यांसह विविध विकासकामांबाबत चर्चा केली. आमदार सिरस्कर यांनी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी निंबी गावचे सरपंच मुरलीधर सगणे यांच्यासह माजी सरपंच लक्ष्मण बोदडे, पंढरीनाथ भिवटे (ग्रा.सदस्य), देवमन वानखेडे (ग्रा. सदस्य), ज्ञानेश्वर पाचपोहे, अशोक वानखेडे, अंबादास नागे, किसन देशमुख, मंगेश मिटकरी व निलेश वरणकार उपस्थित होते.

दरम्यान सरपंच मुरलीधर सगणे यांनी आमदार यांचे स्वागत करुन गावातील विविध समस्या तसेच साेयीसुविधा याविषयी चर्चा केली. निलेश वरणकार यांनीही अामदार यांचे स्वागत करून गावातीत विविध प्रश्नांवर चर्चा केली. व त्यावर काय उपाय याेजना करता येतील याविषयी विचार विनीमय करण्यात आला.