Viman Nagar Pune Crime News | पुणे : विरोधकाला मदत करतो का? ज्येष्ठ नागरिकाला मारहाण, सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Viman Nagar Pune Crime News | विरोधकाला मदत करत असल्याच्या कारणावरुन चौघांनी एका 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण (Marhan) करुन जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.10) सायंकाळी सहा ते साड सहा वाजण्याच्या दरम्यान लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीत (Gurudwara Colony Lohegaon) घडला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.(Viman Nagar Pune Crime News)

याबाबत अंतरयामी लडुराम साहु (वय-62 रा. गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव) यांनी शुक्रवारी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमर वासदेव दुधाळ (वय-49 रा. गुरुद्वारा कॉलनी लोहगाव) याला अटक केली आहे. तर गणेश दुधाळ (वय-23) एक महिला व एका अल्पवयीन मुलीवर आयपीसी 308, 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अमर दुधाळ हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहु यांचा मित्र प्रसन्नचंद्र होता यांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी घरातून पळत बाहेर आले. त्यांनी फिर्यादी यांना रस्त्यात अडवून आमचे विरोधी प्रसन्नचंद्र होता यांना मदत करोता असे म्हणून वाद घातला. त्यानंतर हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्य़ादी यांच्या गुप्तांगावर लाथ मारुली, मात्र, त्यांनी ती हुकवली. आरोपींनी फिर्यादी यांना ढकलून दिल्याने ते भिंतीवर जाऊन आदळल्याने जखमी झाले. साहु यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्योती मेढे (API Jyoti Medhe) करीत आहेत.

तरुणाला स्टंप व बॅटने मारहाण

पुणे : काही एक कारण नसताना तिघांनी मिळून एका तरुणाला क्रिकेट खेळण्याच्या स्टंम्प व बॅटने मारहाण केली. यामध्ये तरुणाच्या डोक्यात, डोळ्यावर व बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जनवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी दत्तु धोत्रे (रा. जनवाडी) त्यांचा मुलगा व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोहेल दिपक धोत्रे (वय-25 रा. जनवाडी) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली