Vinay Aranha In ED Custody | विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेणार्‍या विनय अरान्हाने उधळले बॉलीवूड स्टारवर पैसे; अनेक कारनामे ‘बाहेर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vinay Aranha In ED Custody | रोझरी इंटरनॅशनल स्कूलच्या (Rosary International School) विद्यार्थ्यांना भरमसाट फी आकारली जाते. दुसरीकडे शाळेच्या नुतनीकरणासाठी बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले जाते. मात्र, हा पैसा शाळेमध्ये खर्च करण्याऐवजी ते पैसे बॉलीवूड स्टारवर उधळले. विलासी जीवनशैली जगण्यासाठी आणि महागड्या कार खरेदीसाठी विनय अरान्हाने हे पैसे वापरल्याचे उघड झाले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) न्यायालयात दिलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. (Vinay Aranha In ED Custody)

 

रोझरी इंटरनॅशनल स्कूलच्या विनय अरान्हा याला ईडीने अटक केल्यानंतर आता त्याचे अनेक कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. कॉसमॉस बँकेकडून (Cosmos Bank) त्याने शाळेच्या नुतनीकरणासाठी २०१५ -१६ दरम्यान २० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रत्यक्षात नुतनीकरणासाठी हे कर्ज वापरलेच गेले नाही. शाळेत कोणतीच कामे केली गेली नाहीत. बँकेचे हप्ते थकविल्यानंतर चौकशी केल्यावर अरान्हाने बनावट कागदपत्रे तयार (Fake Documents) केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर काॅसमॉस बँकच्या वतीने शिवाजी काळे यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) आर्थिक गुन्हे शाखेकडे (Pune EoW) तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा पैसा अरान्हा याने काळ्या धंद्यात गुंतविल्याचा संशय असल्याने त्यात ईडीने प्रवेश केला. (Vinay Aranha In ED Custody)

 

ईडीने २८ जानेवारी रोजी रोझरी स्कूलच्या कार्यालयावर तसेच अरान्हा यांच्या घरावर छापा टाकला होता (ED Raids On Educationist Vinay Aranha). त्याचवेळी सेवा विकास बँकेच्या अमर मुलचंदानी (Amar Mulchandani) याच्यावरही छापे टाकले होते. त्यात सेवा विकास बँकेकडूनही (Seva Vikas Co-Operative Bank Ltd) अरान्हा याने कर्ज घेऊन ते बुडविले असल्याचे समोर आले आहे. ईडीने केलेल्या तपासात त्याच्या अनेक बोगस कंपन्या उघडकीस आल्या आहेत. आपली अफरातफर लपविण्यासाठी त्याने रोझरी ग्रुपचे (Group Rosary) गेले ८ ते १० वर्षाचे अकाऊंट बुक तयार केलेले नाही. त्यामुळे त्याचे उत्पन्न आणि खर्च तसेच त्याने घेतलेले पैसे कोठे वळते केले आहेत की नाही हे जाणण्यासाठी त्याची चौकशी गरजेची असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.

विनय अरान्हा हा नेहमीच सॅलिब्रिटींना आपलेसे करण्यासाठी वेगवेगळी निमित्त करुन कार्यक्रमाला बोलवतो.
शहरातील मान्यवरांना अशा पाटर्यांना आमंत्रित करतो. त्यांच्याशी आपले संबंध असल्याचे दर्शविण्यासाठी अशा कार्यक्रमाची पब्लिसिटी तो करत असतो.
त्याने अनेक महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. तळेगाव येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन गैरव्यवहार केल्याप्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते.
विनय अरान्हा याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

 

दुसरीकडे रोझरी इंटरनॅशनल स्कूल ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे.
भरमसाठ फीसाठी रोझरी स्कूलकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप अनेकदा पालकांनी करुन आंदोलनेही केली आहेत.
मात्र, त्याला त्याने कधीही दाद दिली नाही.

 

Web Title :- Vinay Aranha In ED Custody | Vinay Aranha, who charged exorbitant fees from students, squandered money on Bollywood stars

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ileana D’Cruz | इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? समोर आले ‘हे’ कारण

Mango Eating Tips | आंबे खाण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा फायद्यांऐवजी होऊ शकते नुकसान

Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन