Vinayak Mete Accident | अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिल्या ‘या’ 2 महत्वपूर्ण सूचना, गृहमंत्र्यांनी दिलं आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Mete Accident | शिवसंग्रामचे नेते (Shiv Sangram President) विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Express Highway) अपघाती निधन झाले. विनायक मेटे यांच्या अपघाती (Vinayak Mete Accident) निधनंतर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून याचे पडसाद सभागृहात उमटल्याचे पहायला मिळाले. आज सभागृहात झालेल्या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारला (State Government) महत्त्वाच्या सूचना दिल्या. अजित पवारांच्या सूचनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारच्या वतीने आश्वासन दिले.

 

विनायक मेटे यांच्या अपघातावरुन (Vinayak Mete Accident) सुरु असलेल्या चर्चे दरम्यान अजित पवार यांनी अवजड वाहनांच्या धडकेमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. तसेच अशा घटना टाळण्यासाठी पुणे-मुंबई महामार्ग आठ पदरी (8-Lane Highway) करण्याची आवश्यता आहे. असे झाले तर अवजड वाहनांसाठी दोन लेन राखीव ठेवता येतील, अशी सूचना त्यांनी दिली. तसेच अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीचा प्रश्न निर्माण होतो. परंतु असे वाद न घालता ज्या पोलीस ठाण्याला आधी अपघाताची माहिती मिळेल त्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचावं. काही पोलीस अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याने त्यांना कडत आदेश द्यावेत अशी मागणी अजित पवार यांनी दिली.

 

विनायक मेटेंच्या पत्नीचा अजित पवारांना फोन
अजित पवार पुढे म्हणाले, विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती देण्यासाठी मला काल त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे (Dr. Jyoti Mete) यांचा फोन आला होता.
या अपघातानंतर पोलिसांनी कर्तव्यात काही कसूर केला आहे का, यासंदर्भात त्यांचे काही प्रश्न आहेत.
मेटे यांचा कारचालक सतत त्याचा जबाब बदलत असल्याचे वृत्त येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

अजित पवारांच्या मागणीवर फडणवीसांचे उत्तर
पवार यांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस वे संदर्भात केलेल्या मागण्यांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
की, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचना या महत्त्वाच्या आहेत. सध्या मिसिंग लिंकचं काम सुरू आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे समस्या कमी होईल. तसेच चौथ्या लेनची जी सूचना करण्यात आली आहे
ती प्रत्यक्षात आणता येईल का, याची पडताळणी करण्याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विनंती करेन,
असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

 

Web Title :- Vinayak Mete Accident | ncp ajit pawar made 2 important suggestions to the eknath shinde government after the accident of vinayak mete bjp devendra fadanvis reply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Har Ghar Jal Campaign | ‘हर घर जल’ अभियान ! महाराष्ट्राचे 9 जिल्हे -1,500 पेक्षा जास्त गावातील प्रत्येक घरात पोहचले नळाचे स्वच्छ पाणी

 

Tomato Fever In India | वेगाने पसरत आहे Tomato Fever, जाणून घ्या लक्षणे? या लोकांना आहे धोका

 

BJP Chandrashekhar Bawankule | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळेंच्या विधानाने शिंदे गटातील खा. प्रतापराव जाधव यांची धाकधूक वाढली