Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Mete Accident Update | मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मेटे यांचे निधन झाले. त्यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय मराठा ठोक क्रांती मोर्चाने व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर जखमी अवस्थेतील विनायक मेटे यांना मदत मिळण्यास एक तास उशीर झाल्याने ही चौकशी करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय मोहिते, श्वान पथक अपघातस्थळी दाखल झाले आहेत. (Vinayak Mete Accident Update)

 

विनायक मेटे यांच्या कारला अपघात कसा झाला आणि अपघानंतर नक्की काय घडले, याचा शोध घेण्यासाठी एसपीजी, आरटीओ अशी 8 पथके तपास करत आहेत. ही पथके एक्स्प्रेस हायवेवरील सीसीटीव्हींची फुटेज तपासणार आहेत. पोलिसांची दिरंगाई असल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Vinayak Mete Accident Update)

 

खोपोलीजवळ मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ आज पहाटे पाच वाजता जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी कारमध्ये विनायक मेटे दुसर्‍या रांगेतील सीटवर बसले होते. पोलीस सुरक्षारक्षक पुढे बसला होता. मेटेंच्या कार चालकाने थर्ड लेनमधून मध्यल्या लेनमध्ये येण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच ट्रकचालकही लेन बदलत होता. मेटे यांची गाडी वेगात असल्याचा संशय आहे.

वेग जास्त असल्यामुळे चालकाला गाडीचा वेग नियंत्रित करता आला नाही आणि गाडी डाव्याबाजुने ट्रकवर आदळली. एअरबॅग उघडली, पण मेटे मागे झोपले होते ते अचानक पुढे आदळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर दहा टायरचा ट्रक थांबला नाही, चालक ट्रक घेऊन पळून गेला आहे. या ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

 

मेटे यांना अपघातानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटे यांचा चालक एकनाथ कदम यांनी केला.
त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे.
गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे सांगितले.
छोटा टेम्पो चालकाने मदत केली.
दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलली आणि त्यानंतर मेटे यांना रूग्णालयात नेण्यात आले.

 

Web Title : –  Vinayak Mete Accident Update | investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा