Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

बीड : पोलीसनामा ऑनलाइनVinayak Mete Accident | शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ आज पहाटे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मराठा समाजाचे नेते अशीही मेटे यांची ओळख होती. विनायक मेटे यांचे पार्थीव आज बीड येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. उद्या 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता, बीड शहरातील कॅनॉल रोडवरील एका शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Vinayak Mete Accident)

 

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच बीडवर शोककळा पसरली आहे. शिवसंग्राम भवन येथे त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच अनेकांना प्रचंड धक्का बसला. अपघाताचे वृत्त समजताच शिवसंग्रामचे अनेक पदाधिकारी मुंबईच्या दिशेने निघाले होते. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसंग्राम भवन येथे जमले होते. (Vinayak Mete Accident)

 

अंत्यविधीबाबत मेटे कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर, बीडमधील रिलायन्स पेट्रोल पंपामागील कॅनॉल रोडजवळील शेत हे ठिकाण निश्चित करण्यात आले.
शिवसंग्राम भवन येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. केतन राठोड यांनी भेट दिली.
त्यानंतर त्यांनी अंत्यविधी स्थळाची पाहणी केली.

विनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईहून शिवसंग्रामला 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता आणण्यात येईल.
त्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
उद्या 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

 

Web Title :- Vinayak Mete Accident | vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

 

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

 

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे