Vinayak Mete Accident | विनायक मेटेंना अपघातानंतर वेळेवर मदत का मिळाली नाही? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Mete Accident | विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसर्‍या दिवशी दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete Accident) यांच्या अपघाती निधनाबाबत सभागृहात चर्चा झाली. या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली मते मांडली आणि काही प्रश्न उपस्थित केले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने हा मार्ग चौपदरी करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला. यावर सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. यावेळी मेटे यांच्या मृत्यूसंदर्भातील तपासाला धरूनही त्यांनी काही मुद्दे मांडले.

 

ड्रायव्हरला लोकेशन सांगता आले नाही
विनायक मेटे यांच्या अपघाताच्या तपासाबद्दल अधिकची माहिती देताना आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अपघात झाल्यानंतर मेटेंच्या ड्रायव्हरने जेव्हा 112 क्रमांकावर मदतीसाठी फोन केला तेव्हा नवी मुंबई पोलिस मदतीसाठी तातडीने निघाले होते. पण अपघाताच्या धक्क्यामुळे ड्रायव्हर काहीसा गोंधळला आणि त्याला अपघाताचे नक्की लोकेशन सांगता आले नाही. आम्ही पनवेल जवळ आहोत इतकंच तो सांगू शकला. (Vinayak Mete Accident)

 

अशा परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बराच शोध घेतला. त्यानंतर रायगड पोलिसांनाही माहिती दिली. रायगड पोलीसही (Raigad Police) मदतीसाठी निघाले होते. या दरम्यान एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) चे व्यवस्थापन पाहणार्‍या IRB कंपनीला अपघाताची माहिती मिळाली. त्यांची मदत लगेच तिथे पोहोचली पण दुर्दैवाने रूग्णालयात पोहोचेपर्यंत मेटे यांचे निधन झाले होते. त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा घडून नयेत म्हणून ITMS सिस्टीमचा वापर केला जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

Web Title :- Vinayak Mete Accident | Why didn’t Vinayak Mete get timely help after the accident? bjp leader devendra fadnavis Fadnavis gave detailed information

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | नवनीत राणांच्या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? शरद पवार की भाजपा नेते देवेंद्र फडणवीस?

 

CM Eknath Shinde | नगराध्यक्ष, सरपंच निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

 

Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा…’