Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, CID चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसंग्राम पक्षाचे नेते (Shiv Sangram President) विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचा पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Express Highway) अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेकांनी संशय व्यक्त करत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. विनायक मेटे यांचं अपघाती निधनानंतर (Vinayak Mete Death) त्यांच्या समर्थकांसोबतच कुटुंबीयांकडूनही या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने (State Government) घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून पोलीस महासंचालकांना (DGP) या प्रकरणाची चौकशी सीआयडी (CID Inquiry) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.

 

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. मराठा समाजाचे नेते (Maratha community Leader) अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम. जी. एम. रुग्णालयात (M.G.M. Hospital) जाऊन त्यांची भेट घेतली होती.
त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी याची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.
त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title : –  Vinayak Mete Death | vinayak mete accident death case cm eknath shinde order cid inquiry

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा