Vinayak Raut | भाजपशी बेईमानी करुन कुठे जाणार? विनायक राऊतांचा राणेंना सणसणीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. आज (शुक्रवार) नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर (Shivsena) विखारी टीका केली होती. पण, राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, नंतर काँग्रेसशी (Congress) गद्दारी केली, आता भाजपशी (BJP)बेईमानी करुन कुठे जाणार? असा सणसणीत टोला विनायक राऊत (vinayak raut) यांनी लगावला आहे.

 

नारायण राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी करुन काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी गद्दारी करुन ते भाजपमध्ये गेले.
उद्या ते भाजपसोबत बेईमानी करुन दुसऱ्या पक्षात जातील, असा सणसणीत टोला विनायक राऊत (vinayak raut)  यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
तसेच आजपर्यंत नारायण राणे यांनी आपल्या उपकारकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसून जेवढी गद्दारी केली तेवढी कुणी केली नसेल.
त्यामुळे त्यांना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात त्यांनी राणेंना फटकारले आहे.

 

काय म्हणाले नारायण राणे ?

 

तुम्ही जे जिंकून आलात ते मोदींच्या (Narendra Modi) भरोश्यावर. आधी युती केली आणि मग गद्दारी केली.
मिडीयाने काही लोकांना सांभाळून घेतलं, असंही राणे म्हणाले. मोदी सरकार (Modi government) बहुमतात आहे.
तुम्ही तिथे धडक मारणार, पण धडक कशी असते ते माहित नाही वाटतं.
दिल्लीला धडक मारायला आलात तर डोंक राहणार नाही जागेवर.
डोक्याविना संजय राऊत दिसेल तिकडे, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला होता.

 

Web Title : Vinayak Raut | shiv sena mp vinayak raut slammed on bjp leader narayan rane press confernce

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्या मुलाने ED ची चौकशी टाळली, ऋषीकेश यांना वाटतेय ‘ही’ भीती

Modi Government | मोदी सरकारची आणखी एक दिवाळी भेट, खाद्यतेलाच्या किमतीही होणार कमी

Post Office च्या ‘या’ योजनेत मिळते FD आणि RD पेक्षा सुद्धा जास्त व्याज, काही वर्षातच जमा होतील लाखो रुपये