Vinayak Raut | विनायक राऊतांची कडवट टीका, नारायण राणे आणि पनवती हे समीकरण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Raut | अंधरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri by-Election) शिवसेना आणि शिंदे गट दोघांनी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी अर्जच भरता येऊ नये म्हणून शिंदे गटाने (Shinde Group) आखलेली रणनीती न्यायालयाच्या निर्णयामुळे कुचकामी ठरली आहे. आता पुढे काय होणार याची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. कारण या निवडणुकीवरूनच शिवसेना आणि शिंदे गटाचे पुढील राजकीय भविष्य ठरणार आहे. दरम्यान, इतके महत्व प्राप्त झालेल्या अंधेरी पोटनिवडणुकीची जबाबदारी भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Narayan Rane) यांच्यावर सोपवली आहे. यावर राणेंचे कट्टर विरोधक शिवसेनेचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंवर कडवट टीका केली आहे.

 

खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी खोचक टीका करताना म्हटले की, ज्यांनी त्यांना ही जबाबदारी त्यांचे मी आभार मारतो. नारायण राणे आणि पनवती हे समीकरण मुंबई आणि सिंधुदूर्गमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे जबाबदारी अशीच चालू ठेवा.

 

ऋतुजा लटके यांचा राजीनामा लटकवण्यात आला होता, याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिकेला शहाणपण आले. प्रशासन सत्ताधार्‍यांची शहागीर्द म्हणून वावरत असेल, तर योग्य ती जाणीव त्यांना करून देण्याची जबाबदारी मुंबईकरांवर येऊन पडली आहे. प्रत्येक गोष्टीला मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) हाच मार्ग असेल तर, पालिका प्रशासन बरखास्त करा.

ठाण्यातील कार्यक्रमानंतर खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर बोलताना राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नंगानाच घातल्याचे चालते.
उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) ते ऐकरी उल्लेख करतात, शिवीगाळ करतात, धमकी देतात.
दादर, हिंगोली आणि संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी हैदोस घातलेला चालतो. शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटावर टिका टिप्पणी केली
तर, 153 च्या नोटीसा बजावल्या जात आहेत. शिंदे गट पोलीस प्रशासनाचा दुरूपयोग करत आहे. हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.

 

Web Title :- Vinayak Raut | vinayak raut taunt narayan rane over shivsena mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर