×
Homeताज्या बातम्याVinayak Raut Vs Ramdas Kadam | विनायक राऊतांनी रामदास कदमांना डिवचले, म्हणाले...

Vinayak Raut Vs Ramdas Kadam | विनायक राऊतांनी रामदास कदमांना डिवचले, म्हणाले – ‘रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली’

मुंबई : Vinayak Raut Vs Ramdas Kadam | शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट (Shinde Gruop) आणि शिवसेना यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका सुरू आहे. पचास खोके एकदम ओक्के, गद्दार असे शब्द वापरून शिवसेनेचे नेते सतत शिंदे गटातील आमदारांना डिवचत आहेत. यामुळे हा वाद सतत धगधगत आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

विनायक राऊत यांनी म्हटले की, शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली. रामदास कदम जी काही बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही.

राऊत यांनी यावेळी रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा किस्सा सांगितला.
ते म्हणाले, नारायण राणे शिवसेना सोडून चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते. नारायण राणे यांच्यासोबत राणे गटात या, असे शिवसैनिकांना सांगण्यात कदम आघाडीवर होते. (Vinayak Raut Vs Ramdas Kadam)

दरम्यान, रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की,
ते आम्हाला खोके सरकार आणि गद्दार म्हणतात, पण त्याऐवजी त्यांनी गेल्या अडीच वर्षात काय केले
ते जनतेला सांगावे. या टिकेनंतर विनायक राऊत यांनी रामदास कदमांचा समाचार घेतला आहे.

Web Title :- Vinayak Raut Vs Ramdas Kadam | ramdas kadam is the one who planted the worm of treachery in shiv sena vinayak rauts attack marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम, म्हणाले…

Pankaja Munde | ‘सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे…’, पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने मोफत रेशनसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News