कौतुकास्पद ! ‘दंगल’ पाहण्यास मिळणार, विनेश फोगटनं मिळवलं ऑलिम्पिक ‘तिकिट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुस्तीवर आधारित ‘दंगल’ या बहुचर्चित बॉलिवूड चित्रपटानंतर समाजात सगळीकडे कुस्तीची खूपच क्रेझ वाढली आहे. कुस्ती या प्रकारात भारतीय महिला कुस्तीपटू चांगली कामगिरी बजावताना दिसत आहेत. त्यात आता भारताची प्रसिद्ध कुस्तीपट्टू विनेश फोगटने २०२० साली टोकिओ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

५३ किलो वजनी गटातून ऑलिम्पिक साठी पात्र
विनेशने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटला धूळ चारत २०२० मध्ये टोकियोला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी साठी आपले स्थान निश्चित केले आहे. अशी कामगिरी करणारी विनेश फोगट ही पहिलीच कुस्तीपट्टू ठरली आहे. विनेशने ही चमकदार कामगिरी ५३ किलो वजनी गटामध्ये केली आहे.

जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्यापासून एक पाऊल दूर
विनेशने या स्पर्धेत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटला ८-२ ने पराभूत करून कांस्य पदकासाठी पात्र ठरली आहे. यानंतर कांस्यपदकासाठी विनेशला ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे जागतिक कुस्ती स्पर्धेत आपले पहिले वहिले पदक मिळवण्यापासून विनेश केवळ एक पाऊल दूर आहे. विनेशने या स्पर्धेत ५० आणि ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता. विनेश सोबत पराभव पत्करावा लागलेल्या साराला मागच्या वर्षी ५३ किलो वजनी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

विनेश सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार
जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेशला सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. याच्या आधी विनेशने युक्रेनच्या युलियावर ५-० ने मात केली होती. या व्यतिरिक्त या स्पर्धेत भारताच्या पूजा धांडाने स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात आपले ऑलिम्पिक साठीचे स्थान निश्चित करण्यासाठी भाग घेतला आहे.

आता पूर्ण लक्ष्य ऑलिम्पिकवर
आता या स्पर्धेनंतर विनेश फोगटचे पूर्ण लक्ष्य २०२० मध्ये टोकियोला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर असणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धत सुवर्ण पदक जिंकणे हेच विनेशचे पहिले प्रधान्य असणार आहे. त्यामुळे विनेशच्या तयारीला आणखी गती मिळणार आहे.

Visit – policenama.com