विनेश फोगटची सुवर्ण कमाई 

 जकार्ता :
आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.  विनेशने अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीवर ६-२ असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विनेशने इतिहास रचला आहे.
अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी इरीवर प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना आपल्या नावावर केला. याआधी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.
[amazon_link asins=’B0794W14FY,B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a00ce24a-a483-11e8-9e81-1b6a365c6945′]
विनेशची आतापर्यंतची आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. कारण यापूर्वी विनेशला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. पण आता अंतिम फेरीत विनेश जिंकली तर सुवर्ण आणि पराभूत झाली तर तिला रौप्यपदक मिळू शकते. विनेशने गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.