Vinod Kambli | माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींवर गुन्हा दाखल; पत्नीने केली तक्रार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विनोद कांबळी यांनी दारू पिऊन मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचे कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. अँड्रिया यांनी कांबळी यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विनोद कांबळींवर (Vinod Kambli) IPC 324 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?
विनोद कांबळी यांनी कुकिंग पॅन फेकून मारल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. या घटनेत अँड्रिया यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले आहे. पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी कांबळी यांचा 12 वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मारहाणीच्या घटनेनंतर विनोद कांबळी यांच्या पत्नीवर उपचार करण्यात आले आहेत.

 

विनोद कांबळी यांची कारकीर्द
कांबळी (Vinod Kambli) भारताकडून 17 टेस्ट खेळला, यात त्याने 54 च्या सरासरीने 1084 रन केले.
त्यामध्ये 4 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये त्याने 97 इनिंगमध्ये 33 च्या सरासरीने 2477 रन केले,
ज्यात 2 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कांबळीने 35 शतकांसह 9,965 रन केले आहेत.

 

Web Title :- Vinod Kambli | case registered against former cricketer vinod kambli for abusing and harassing wife andrea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime News | सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; औरंगाबादमधील घटना

Raigad District Bank Fire | रायगड जिल्हा बँकेला भीषण आग; कागदपत्रे एका क्षणात जळून खाक

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास