‘या’ दिवंगत सुपरस्टारच्या मुलानं निवडला अध्यात्माचा मार्ग, अभिनेत्याऐवजी बनणार ‘संन्यासी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 70 च्या दशकाचे सुपरस्टार विनोद खन्ना जेव्हा आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यावर होते तेव्हा त्यांनी अध्यात्मिक गुरु ओशोचा आसरा घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता विनोद खन्नाचा मुलगा साक्षी खन्नासुद्धा आपल्या वडिलांच्या पाऊलांवर चालत असल्याचे समजले आहे. असे म्हणले जाते की, साक्षीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्याने ओशो इंटरनॅशनलमध्ये प्रवेश केला आहे.

साक्षी हा विनोद खन्नाची दुसरी पत्नी कविताचा मुलगा आहे. जेव्हा विनोद खन्ना यांनी ओशोमध्ये प्रवेश केला होता तेव्हा भारतामध्ये त्यांचे येणे-जाणे खूपच कमी झाले होते. मोठ्या ब्रेकनंतर ते चित्रपटसृष्टीत परतले. १९८७ मध्ये ते पुन्हा ‘इंसाफ’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवले. दुसरी गोष्ट म्हणजे आधी असलेले स्टारडम त्यांना परत मिळवता आले नाही.

विनोद खन्ना यांनी संन्यास का घेतला याचे कारण कोणालाही माहित नव्हते, परंतु असे मानले जाते की विनोद खन्ना यांना कुटुंब आणि कारकीर्द सांभाळणे अवघड होते, म्हणूनच त्यांनी संन्यासी होण्याचा निर्णय घेतला. विनोद हे परतल्यानंतर त्यांची पहिली पत्नी गीतांजलीशी असलेले त्यांचे नाते तुटले होते. त्यानंतर त्यांनी कविताशी लग्न केले.

विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षीबद्दल सांगायचे झाले तर ४ वर्षांपूर्वी मिलन लुथरियाच्या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण ना तो बॉलीवूडमध्ये डेब्यू करू शकला ना कोणाला त्याचे कारण माहित झाले. विनोद खन्नाचा मोठा मुलगा अक्षय खन्नाबद्दल बोलायचे म्हणले तर तो बॉलिवूडमध्ये सतत चित्रपट करत आहे. 2019 मध्ये त्याचा चित्रपट ‘कलम 375’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.