Vinod Patil | युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली? मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा गिरीश महाजन यांना संतप्त सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) रखडलेल्या आरोग्य पदभरतीबाबत माहिती विचारणाऱ्या उमेदवाराला फोनवरुन झापतानाची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपच्या सत्यतेबाबत ‘पोलीसनामा’ पुष्टी करत नाही. परंतु या व्हायरल क्लिपमुळे गिरीश महाजन यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठा आरक्षण (Maratha Reservation) याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी देखील महाजन यांच्यावर टीका केली आहे. रोजगारासाठी प्रश्न विचारणाऱ्या युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली? असा टोला विनोद पाटील (Vinod Patil) यांनी लगावला आहे.

याबाबत विनोद पाटील (Vinod Patil) यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे जबाबदार मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी ZP मधील भरती (Recruitment) संबंधी केलेल्या अर्वाच्य वक्तव्याचा जाहीर निषेध. सरकार कोणाचे असो आम्हाला फक्त नोकरी द्या या एकाच आकांत भावनेतून आजचा युवक नोकरी (Job) मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याचे दुःख त्याच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. इतक्या असंवेदनशील मनाचा निषेध करावा तितका थोडाच. साहेब या भरतीमध्ये 13 हजार 521 जागांसाठी जवळपास 13 लाख परीक्षार्थींनी अर्ज केले. या परीक्षार्थीकडून 25 कोटी 87 हजार रुपये आपल्या सरकारने जमा केले मग परीक्षा कधी असे विचारल्याचा इतका राग का??? असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.

25 कोटी 87 हजार रुपयांचे काय केले?

इतके वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची काय अवस्था झाली असेल? राज्यात टीईटी (TET), आरोग्य भरती (Health Recruitment), महापरीक्षामध्ये घोटाळे झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे ही भरती परत घेण्याची जबाबदारी आपण त्याच खासगी भ्रष्टाचारी कंपन्यांना देणार की, पारदर्शकपणे भरती प्रक्रिया पार पाडणाऱ्या MPSC, IBPS सारख्या नामांकित आयोग, संस्थाकडे देणार याचे उत्तर द्यावे. रोजगारासाठी प्रश्न विचारणाऱ्या युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली? भरती प्रक्रिया रद्द केली तर मग जवळपास 13 लाख अर्जांमधून मिळालेले 25 कोटी 87 हजार रुपयांचे काय केले? असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0dJpeRfneoLCPyQcnKrqUsk9ZwHFxeQv41Q4WhYkXa8wGZHZUTBNugEWJic5SNrHEl&id=100044574933191

 

Web Title :- Vinod Patil | maratha reservation petitioner vinod patil criticizes girish mahajan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा