शरद पवार साहेब आपली भूमीका स्पष्ट करा : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कलम ३७० ठेवावं असं पाकिस्तानला वाटतं. शरद पवार यांना ३७० बद्दल काय वाटतं. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भातील एक व्हीडीओ ट्विटरवर ट्विट केलं आहे.

विरोधक म्हणतात की मोदी विरोधकांना दहशतवादी म्हणतात. शरद पवार यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. कलम ३७० आणि ३५ (अ) वर तुमची भूमीका स्पष्ट करा. ते जर ठेवलं तर काश्मीरचा प्रश्न सतत सुरु राहतो. ते काढलं तर आपोआप काश्मीरचा प्रश्न सुटतो. ते ठेवलं पाहिजे असं दहशतवादी पाकिस्तानला वाटतं. असं ते म्हणाले.

त्याबरोबरच मोडकं तोडकं गठबंधन झालं आहे. विरोधक देशभरात एकत्र नाहीत. निवडणूकीत एकत्र यावं लागलं असं सीताराम येचूरी म्हणतात. आपण विरोधकात बसू असं सीताराम येचूरींना वाटतं. सीताराम येचूरी आज बोलले ते शरद पवारांना आधीच कळलं. त्यामुळे त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली. या मुद्द्यावर शरद पवार साहेब आपण आपलं मत स्पष्ट करा. असं ते म्हणाले.

तर आयकरचे देशात जे छापे पडत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस अस्वस्थ आहे. कॉंग्रेसचे निवडणूकीतील महत्त्वाचे हत्यार असलेले पैसेच अडकले आहेत. त्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. या काळात त्यांच्या हालचाली आयकर विभागाला लक्षात आल्या त्यावरून त्यांनी छापे टाकले. निवडणूक आयोगाने सरकारचा यात हात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असंही ते म्हणाले.