… म्हणून पंकजा मुंडे दुःखी, भेटीनंतर विनोद तावडेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कालपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजप सोडणार याची. या दरम्यान आज विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. रॉयलस्टोन या शासकीय बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंकजा मुंडे यांनी फेसबूक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांना येण्याचे निमंत्रण दिले. या दरम्यान पुढील राजकीय वाटचालीबद्दल निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. परंतू पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला आहे. त्यामुळे त्या व्यथीत आहेत. बाकी त्यांची पक्षावर कोणतीही नाराजी नाही असे भाजप नेते विनोद तावडे यांनी भेटीनंतर सांगितले. त्या पक्षांच्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत. 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांना त्या योग्य तो संदेश देतील असे ही विनोद तावडेंनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस आणि पंकडा मुंडेची फोनवरुन चर्चा
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे यांना जेवणाचे आमंत्रण देखील फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे पक्ष सोडून कोठेही जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी भेटून येणाऱ्या भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूकीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.

आज केलेल्या पोस्टमध्ये पंकजा मुंडेंनी कमळाचा उल्लेख केला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अभिनंदन करणारी पोस्ट पंकजा मुंडेंनी केली. आधी पंकजा मुंडेच्या प्रोफाईलचे यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप होते. परंतू ट्विटर पेजवर फक्त पंकजा मुंडे असे लिहिले आहे. त्यामुळे त्या एखादा मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात असे बोलले जात आहे. पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत असे सांगितले जाते. त्यांनी फेसबूक पोस्टवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

Visit : policenama.com