सोलापूर: Vinod Tawde | महाराष्ट्र हा मुद्द्यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो. पण सध्या सुरु असलेल्या राजकारणात हे चित्र दिसत नाही. अनेकदा राजकारण्यांकडून सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात की त्यांच्या हिताच्या मुद्यांवर त्यांनी चर्चा करायला हवी. मात्र हे घडताना दिसत नाही. महत्वाचे मुद्दे सोडून सत्ताधारी आणि विरोधक हे मुद्द्यावर न बोलता बाकी गोष्टींवरच आरोप-प्रत्यारोप करीत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे दुर्लक्षित होतात. (Maharashtra Politics)
‘महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि आपले विचार वेगळे असतात. मुद्दांवर सत्ताधारी-विरोधकांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे. सध्याचे राजकारण हे मुद्द्यांवर न होता, अन्य गोष्टींवर होत आहे’, असे विधान करत भाजप नेते विनोद तावडे यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना फटकारले आहे. राज्यातील सध्याच्या राजकारणावर भाजप नेते विनोद तावडे यांनी भाष्य केले आहे. आषाढी वारीत (Pandharpur Ashadhi Wari) भाजप नेते विनोद तावडे सहभागी झाले आहेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ” “महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि आपले विचार वेगळे असतात. मुद्द्यांवर सत्ताधारी-विरोधकांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे. सध्याचे राजकारण हे मुद्द्यांवर न होता, अन्य गोष्टींवर होत आहे,” अशी खंत तावडे यांनी व्यक्त केली. ” पुरोगामी महाराष्ट्र हा मुद्द्यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण केले पाहिजे,” अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षापासून मी माऊलींच्या पालखीत सहभागी होत असतो. आज मी वाखरी येथे माऊलींच्या पालखीत सहभागी झालो आहे. “राज्यात पाऊस पाणी पडू दे, तमाम जनतेला सुख , शांती समृद्धी मिळू दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घातल्याचे तावडे यांनी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Lonikand Pune Crime News | पुणे: इंन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज, क्लासला जाताना पाठलाग अन् शिवीगाळ;
तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर पोक्सोचा गुन्हा
Pune Rural Police | लोणावळा: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून गांजाची तस्करी करणारी टोळी गजाआड;
48 किलो गांजासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)